🎯राष्ट्रीय डॉल्फिन दिवस - 5 ऑक्टोबर
▪️भारतात गंगा नदी डॉल्फिनच्या संवर्धनासाठी जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी गंगा नदी डॉल्फिन दिन साजरा केला जातो.
▪️2010 मध्ये याच दिवशी गंगा डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित करण्यात आले होते.
▪️त्यानंतर 2012 मध्ये वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF) आणि उत्तर प्रदेश सरकारने संयुक्तपणे डॉल्फिन संवर्धन मोहीम देशात सुरू केली.
▪️गंगाच्या डॉल्फिनचा समावेश भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम1972 च्या पहिल्या अनुसूची अंतर्गत करण्यात आला आहे.
▪️त्याचप्रमाणे यांना IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर) अंतर्गत “लुप्तप्राय” घोषित करण्यात आले आहे.
▪️ ते परिशिष्ट I अंतर्गत सर्वात धोक्यात आलेले आहेत.तसेच स्थलांतरित प्रजातींच्या संवर्धनाच्या परिशिष्ट II अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
إرسال تعليق