*महामंडळाचे थांबेना झोल*??
*महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाकडे कोणतीही माहीती संकलीत नाही*?
राज्यशासनाच्या सामाजिक
न्याय विभागातील हे महत्वाचे महामंडळ आहे.कंपनी कायद्यानुसार 1978 ला स्थापना. या महामंडळाकडे
आरटीआय अंतर्गत मी मागील सन 2011ते जुलै 2022 पर्यत तरतुद निधी,खर्च व शिल्लक याचा तपशील विचारला होता.
त्यानंतर कर्जासाठी राज्यातील एकुण आलेली संख्या,त्यामध्ये लाभार्थी आणी प्रलंबित अर्ज
या सर्वांची आकडेवारी विचारली होती.
तसेच कर्ज न फेडलेल्या तरुणांची आकडेवारी मागितली होते.
शेवटी त्यांच्या जणजागृती खर्चाचा तपशील ही मागीतला होता.
या महामंडळांनी माहीती तर
दीली नाहीच.पण धक्कादायक उत्तर मात्र दोन ओळीत दिले.*माहीती संकलित करण्याचे काम अजुन सुरु आहे.झाल्यावर देण्यात येईल*
हे उत्तर दिले.
मुळात हा अर्ज दीड महिन्यापुर्व मी केला होता.सगळी यंत्रणा आता आँनलाईन झालीय.महिन्यात माहीती देणे शक्य होते.फक्त आकडेवारी देण्यास काहीच हरकत नव्हती.मग झाले काय नेमके!
*काहीतरी गौडबंगाल निश्चित आहे*.
कारण दिलेल्या उत्तरात राज्यातील या महामंडळाच्या मुख्यकार्यालयाचा पत्ता,ईमेल,नंबर व त्यावर माहीती अधिकार्याची शिक्का व नाव ही नाही.या वेबसाईटवर वर्षाभरापासुन नवीन अपटेड काहीच केले नाही.खात्याचे मंत्री,संचालक टीम,याची
माहीती टाकली नाही.
*बरं ही हजारो कोटी रु.ची उलाढाल करणारी महामंडळ आहेत..ऐवढा हलगर्जीपणा कसा करु शकतात*?
या शासन मान्य महामंडळाला कोणी वालीच नाही का?.याचे गार्भीयांनी कोणीही दखल का घेत नाही.
*गंभीर,दुर्दवी व चिंताजनक बाब आहे.अशी परिस्थिती सर्वच महामंडळाची कमीअधिक आहे*.
राज्यकर्ताच्या ईच्छाशक्तीचा अभाव व प्रशासनाची उदासिनता,जनतेमध्ये माहीतीचा अभाव यामुळे हि महामंडळे डबगाईला येतात,आणली जातायत,आणी पर्यांयानी
हि बंद पडतील...!!
*लोककवी वामनदादा कर्डक म्हणतात* ,
*मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा*...!
*दोष देउ कोणा...दोष देउ कोणा*...!
तशीच गत झाली आहे.
*कुलदीप आंबेकर*
*9689794776*
*अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस*
Post a Comment