महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या ज्या भागांमध्ये विभागल्या गेला आहे ते प्रादेशिक विभाग म्हणजे कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ. यापैकी उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश होय.
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग यात काय फरक आहे |
या भौगोलिक विभागाच्या प्रशासनाकरिता ( Governance ) शासनाने संपूर्ण महाराष्ट्राची सहा महसुली प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. या प्रशासकीय विभागाचा प्रमुख म्हणून आयुक्त ( commissioner ) नेमला जातो. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे आणि मुंबई असे सहा प्रशासकीय विभाग आहेत. प्रादेशिक विभागाचा विचार केला तर विदर्भात अमरावती व नागपूर असे दोन प्रशासकीय विभाग, मराठवाड्यात औरंगाबाद हा एक तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोंकणसाठी मुंबई असे प्रशासकिय विभाग आहेत.
ही विभागणी सर्वसाधारण असून शासनात असलेल्या इतर विभागांनी आपापल्या कामकाजाचा विचार करून वेगळी विभागणी सुद्धा केलेली आहे.
Post a Comment