महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा सार्वजनिक उपक्रम)
सन २०२२-२०२३-२०२४-२०२५ मध्ये होणाऱ्या JEE/MH-CET/NEET या परीक्षांच्या ऑनलाईन/ऑफलाईन पुर्वतयारी साठी इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, आणि धनगर या समाज घटकातील क्रिमिलेयर गटा मध्ये नसलेल्या इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या इच्छूक व पात्र विद्यार्थ्यांनी करावयाच्या अर्जाचा नमुना.
जाहिरात
MH-CET/JEE/NEET या परिक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतीबा फुले | संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर येथे कार्यरत | असुन MH-CET/JEE / NEET या परिक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी | इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व धनगर या समाज घटकातील नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील इयत्ता 10 वी च्या परीक्षेत (सर्व | शिक्षणमंडळ / बोर्ड) 70% पेक्षा जास्त गुण ( आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी 60% पेक्षा जास्त गुण) असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयात चालू सत्रात इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश |घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी विहित नमुन्यातील अर्ज महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर Notice Board या लिंकवर Students Application for MH-CET/JEE / NEET Coaching वर उपलब्ध असून, परिपूर्ण भरलेले अर्ज सदर संकेतस्थळावर दि. दीलेल्या पर्यंत अपलोड करावे. प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षणाच्या नोंदणीवेळी उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्र व शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करावे लागेल याची नोंद घ्यावी.
व्यवस्थापकीय संचालक
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर
free-tablet-yojana-maharashtra-mahajyoti-registration
إرسال تعليق