नमस्कार🙏🏻,
केंद्र सरकारने पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या वतिने केंद्रिय भटके विमुक्त विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष कर्मवीर दादा इदाते यांच्या प्रयत्नाने भटके विमुक्तांसाठी ४ योजना चालू केल्या आहेत.
१).प्रधानमंत्री आवाज योजना(भटके विमुक्त).
२).प्रधानमंत्री जनआरोग्य योजना/आयुष्यमान भारत(भटके विमुक्त).
३).मोफत स्पर्धा परिक्षा क्लासेस.(UPSC/MPSC/NEET etc.)
४).उपजीविका.
केंद्रिय भटके विमुक्त विकास व कल्याण बोर्ड,सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येणार आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे.
केंद्र सरकारने १६ फेब्रुवारी रोजी या योजनांचा शुभारंभ केला आहे.
सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त भटके विमुक्त समाजबांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.खासकरुन आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ घ्यावा.
भटके विमुक्तांसाठी कार्य करणार्या संस्था,संघटना,नेते व कार्यकर्ते यांनी समाजामध्ये या योजनेविषयी जनजागृती करावी.३१ मार्चपुर्वी जास्तीत जास्त अर्ज करावेत हि नम्र विनंती.
*👉🏻For Registration click to the below link for scheme to enrol it only for DNT, NT & SNT.*
https://seed.dosje.gov.in
*👉🏻 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:-*
१).ईमेल आयडी असावा आणि बँक लिंक असलेला मोबाईल नंबर.
२).आधार कार्ड.
३).जात प्रमाणपत्र.
४).उत्पनाचा दाखला(२.५ लाख पेक्षा कमी)
५).बँक पासबूक(Acc.No & IFSC Code) दिर्शवणारे पान अपलोड करायचे आहे.
—हे अपलोड झाल्यानंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतर आपला UID नंबर तयार होईल तो जपून ठेवावा.
श्री.अनिल देविदास फड
राष्ट्रीय कार्यवाह- भटके विमुक्त जनजाती विकास परिषद(अखिल भारतीय)
गजानन अंकुशराव पलावे
उपाध्यक्ष :- महा ज्योती विद्यार्थी हक्क परिषद महाराष्ट्र राज्य,
tag
إرسال تعليق