Youtube ChannelSubscribe Now

Follow On Google News

Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

एमएचटी सीईटी २०२२ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने |पूर्व तयारी २०२२ -२३ या पुर्वापेक्षित अट

 एमएचटी-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट



एमएचटी सीईटी २०२१ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.


✺ संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.


✺ दिव्यांग उमेदवाराजवळ दिव्यांगत्वाचे किमान ४० टक्के किंवा अधिक असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.


✺ एमएचटी सीईटी २०२१ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-


महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ६००/-


✺ उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.


✺ ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.


✺ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.


✺ कृपया आपला आप्लिकेशन नंबर , पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.


✺ कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.


✺ उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.


✺ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड

2. 10 वी MARK SHEET

3. फोटो आणि सही

4. मोबाईल नंबर ईमेल आयडी

5. जात प्रमाणपत्र

अधिक माहिती साठी pdf वाचा व आमच्या संपर्कात राहा .

pdf link -click here



⬆️ALL INFORMATION ABOUT MHT-CET REGISTRATION⬆️ 


Post a Comment

Previous Post Next Post

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now