भारताच्या नकाशा मध्ये...
श्रीलंका का दाखवतात ?
भारताच्या+नकाशा+मध्ये...+++श्रीलंका+का+दाखवतात |
भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवतात? पाकिस्तान, चीन किंवा उत्तरेकडील सीमांना लागून असणारे इतर कोणतेही देश भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत.
तुम्ही भारताचा नकाशा अनेकदा पाहिला असेल. त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवली असेल की, भारताच्या नकाशामध्ये अनेकदा श्रीलंकेचा नकाशाही दाखवला जातो.
सध्या श्रीलंकेतील आर्थिक संकट, महागाई हा जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पण भारताचा शेजारी असणारा हा चिमुकला देश भारताच्या नकाशात का दाखवला जातो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
अगदी भूगोल विषय शिकवताना वापरल्या जाणाऱ्या नकाशा मध्येही श्रीलंका दाखवला जातो. मात्र त्याचवेळी भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणतेही देश भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत.
सामान्यपणे भारताच्या नकाशा सोबत श्रीलंका वगळता इतर कोणताही देश अगदी स्पष्टपणे दाखवला जात नाही. मात्र असं का आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
भारत आणि श्रीलंकेचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे या मागील कारण नाहीय. भारताच्या नकाशामध्ये तळाशी अनेकदा श्रीलंकेचा नकाशा दाखवण्यामागे एक विशिष्ट कारण आहे.
एका विशेष कारणामुळे भारताच्या नकाशामध्ये अनेकदा श्रीलंका प्रामुख्याने आणि ठसठशीतपणे दाखवला जातो. नक्की कोणत्या कारणामुळे असं केलं जातं आपण जाणून घेऊया. बरं या निर्णयामागे हिंदी महासागराची भूमिका कशी महत्वाची
भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका दाखवला जाण्याचा असा अर्थ नाहीय की श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे किंवा दोन्ही देशांमध्ये नकाशा संदर्भात काही करार झालाय. खरं तर अशा प्रकारे भारताच्या नकाशा मध्ये श्रीलंकेचा नकाशा दाखवण्याचं कारण आहे. समुद्रा संदर्भातील आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा म्हणजेच ओशियन लॉ. या कायद्याची निर्मिती तसेच ते जगभरामध्ये लागू करण्याचं काम संयुक्त राष्ट्र संघाने केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारानेच हा कायदा अस्तित्वात आलाय.
हा कायदा बनवण्यासाठी सर्वात आधी सन १९५६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये ‘यूनायटेड नेशन्स कनव्हेक्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर १९५८ साली या संम्मेलना मधील चर्चा आणि मतांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यात आला. समुद्रा मधील सीमा आणि निर्बंधा बद्दल जगभरातील देशांचं एकमत असावं या हेतूने हा कायदा बनवण्यात आला होता. त्यानंतर १९८२ साली तीन वेगवेगळ्या संम्मेलानांचं आयोजन करुन समुद्रातील सीमा संदर्भातील कायद्यांना मान्यता देण्यात आली.
या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं की, किनारपट्टी असणाऱ्या देशांच्या समुद्र किनाऱ्या पासून त्या देशांची बेस लाइन ही २०० नॉटिकल माइल इतकी असेल. या बेस लाइनच्या आतील भागामध्ये येणारी बेटं आणि भौगोलिक ठिकाणं देशाच्या नकाशामध्ये दाखवणं बंधनकारक करण्यात आलं. अगदी सोप्या शब्दा मध्ये सांगायचं झाल्यास, एखाद्या देशाला समुद्रकिनारा लाभला असेल, तर त्या समुद्रकिनाऱ्या पासून समुद्रामध्ये २०० नॉटिकल माइल अंतरांवरील गोष्ट नकाशात दाखवणं या कायद्यानुसार अनिवार्य आहे. याच कारणामुळे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा नकाशाही दाखवला जातो. भारत आणि श्रीलंके मधील अंतर हे २०० नॉटिकल माइलहून कमी आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्या पासून २०० नॉटिकल माइलच्या आतील सर्व भौगोलिक गोष्टी नकाशामध्ये दाखवल्या जातात.
२०० नॉटिकल माइल म्हणजे किती हे किलोमीटर मध्ये सांगायचं झाल्यास गणित सोपं आहे. एक नॉटिकल माइल म्हणजेच १.८२४ किलोमीटर. या हिशोबाने २०० नॉटिकल माइलचं अंतर हे ३७० किलोमीटर इतकं होतं. म्हणजेच भारतीय समुद्रकिनाऱ्या पासून ३७० किमी अंतरांवरील सर्व गोष्टी भारताच्या नकाशामध्ये दाखवल्या जातात. त्यामुळेच श्रीलंका एक स्वतंत्र देश असला तरी तो भारताच्या नकाशामध्ये दाखवला जातो.
भारत आणि श्रीलंके मधील अंतर किती या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास भारताचं शेवटचं टोक असणारं धनुषकोडी हे श्रीलंके पासून १८ मैलांवर आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका दाखवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशा सोबत श्रीलंकाही दाखवल्याने वाद होत नाही आणि जगभरा मध्ये हाच नियम पाळला जातो.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Post a Comment