mahajyoti free tablet yojana maharashtra
mahajyoti-free-tablet-yojana-maharashtra
free-tablet-yojana-maharashtra-mahajyoti-registration
महाज्योती फ्री टॅबलेट योजना | mahajyoti | mahajyoti free tablet yojana | mahajyoti free tablet yojana maharashtra | free tablet yojana maharashtra | mahajyoti tablet yojana
बातमी प्रसिध्दीसाठी
फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र उद्देश
mahajyoti free tablet yojana purpose
- *महाज्योती देणार १५ हजार ओबीसी विद्यार्थ्यांना निट जेईई चे स्पर्धा पुर्व परीक्षेचे मोफत आॅनलाईन प्रशिक्षण!*
- *सोबत आठ इंची ब्रॅंडेड टॅब व दररोजचे सहाजीबी इंटरनेट सुध्दा मोफत!*
*महाज्योतीच्या संकेत स्थळावर मोफत नोंदणी करण्याचे संचालक प्रा. दिवाकर गमे यांचे आवाहन!*
*महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे* ओबीसी,विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी, तसेच समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी दोन वर्षापासुन कार्यरत आहे.
या महाज्योतीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी,एमपीएससी, विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण दिले जात आहे.
तर पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार प्रमाणे पाच वर्षे फेलोशिप देण्याचा निर्णय महाज्योतीने घेतला असुन सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ती देण्यात येत आहे.
या शिवाय स्किल डेवलपमेंट मोफत प्रशिक्षणा अंतर्गत राज्यातील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना विविध ट्रेडचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असुन,विविध कंपण्या, औद्योगिक कारखाने यामधे त्यांचे यशस्वीपणे प्लेसपेंट केल्या जात आहे.तसेच नॅशनल डिफेंस अकादमी स्पर्धा पुर्व प्रशिक्षण २०० निवासी मुलींसाठीचा महत्वाकांक्षी प्रशिक्षण प्रकल्प नायगाव येथे राबविला जाणार आहे.
अशाच या महाज्योतीचा
जेईई निट एमएच—सीईटी
करणार्या सामान्य, ग्रामीण ,गरीब, व महागडे कोचिंग लावण्याची आर्थिक ऐपत नसलेल्या ,परंतु इंजिनिअर डाॅक्टर होवु इच्छिणार्या ,व
१२ वी च्या परीक्षेनंतर २०२४ मधे होणार्या या स्पर्धा परीक्षेला सामोर्या जाणार्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी, मोफत आॅनलाईन कोचिंग व स्पर्धा पुर्व प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाज्योतीचे अध्यक्ष तथा ओबीसी मंत्री मा. ना. श्री विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आलेला आहे.
त्या नुसार या वर्षी मार्च २०२२ मधे मॅट्रीकची परीक्षा दिलेल्या व ११ वी सायंसमधे प्रवेश घेवुन २०२४ च्या जेईई निट परीक्षेची तयारी करण्यास इच्छुक असलेल्या ओबीसी विजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकडुन, महाज्योतीच्या संकेतस्थळावर १ मे २०२२ पासुन मोफत नोंदणी सुरू झालेली आहे.
या आॅनलाईन पध्दतीने मोफत स्पर्धा पुर्व प्रशिक्षणासाठी शहरी भागात असणार्या विद्यार्थ्यांना २०२२ च्या मार्च महिण्यातील दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण तर ग्रामीण भागातील, आदिवासी बहुल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्यांने वर्ग ११ वी सायंस ला प्रवेश घेवुन,पुढे शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे तसे बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे अनिवार्य आहे. या शिवाय हा विद्यार्थी ओबीसी विजेएनटी एसबीसी असुन तो नाॅन क्रिमिलेयर आहे असे जात व नाॅन क्रिमिलेयरचे प्रमाणपत्र पुढे सादर करणे अनिवार्य आहे.
यापुर्वि २०२२ च्या जेईई निट परीक्षेसाठी महाज्योतीकडे तीन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असुन त्यांना मोफत टॅब सह यशस्वीपणे मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर २०२३ च्या निट परीक्षेसाठी सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असुन त्यांचे आॅनलाईन प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यांना लवकरच मोफत टॅब व मोफत दररोजचे सहाजीबी इंटरनेट देण्याची कार्यवाही सुरू होत आहे, *तर २०२४ साठी पंधरा हजार विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन प्रशिक्षण देण्याचे उदिष्ठ महाज्योतीने ठरविले असुन, या सर्व विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने, मोफत आॅनलाईन प्रशिक्षण,मोफत कायम स्वरूपी ब्रॅंडेड कंपनीचा आठ इंची टॅब व निट २०२४ ची परीक्षा होईपर्यंत मोफत सहा जीबी इंटरनेट डेटा दिला जाईल. तसेच जेईई निट परीक्षेची आवश्यक सर्व पुस्तके मोफत विद्यार्थ्यांना घरपोच पाठविली जाईल.*
तरी ओबीसी विजेएनटी एसबीसी च्या वर्ग १० वी ची परीक्षा दिलेल्या व सायंस ला अॅडमिशन घेवु इच्छिणार्या विद्यार्थी विद्यार्थींनींनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावून तत्काळ मोफत नोंदणी करावी. महाज्योती प्रथम येणारास प्राधान्य या तत्वावरच विद्यार्थ्यांसाठी १ जुलै २०२२ पासुन आँनलाईन प्रशिक्षण सुरू करणार आहे. तरी महाज्योतीच्या या योजनांचा सामान्य, गरीब विद्यार्थी विद्यार्थींनींनी लाभ घ्यावा.
Post a Comment